Type Here to Get Search Results !

गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयात रंगतदार प्रवेशोत्सव मुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत; फुग्यांची सजावट, सेल्फी पॉईंट, मिष्टान्नाने विद्यार्थिनींना आनंद द्विगुणित

 गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयात रंगतदार प्रवेशोत्सव

मुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत; फुग्यांची सजावट, सेल्फी पॉईंट, मिष्टान्नाने विद्यार्थिनींना आनंद द्विगुणित

 तळोदा  (प्रतिनिधी) – 

तळोदा  येथील गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेशोत्सव १६ जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी फुगे, विद्यार्थिनींच्या रांगोळ्या आणि सजवलेली पटांगण यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता.

               नवप्रवेशित विद्यार्थिनींचे मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच नवप्रवेशित   विद्यार्थिनींचे औक्षण विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.वैशाली देवरे व श्रीम.भाग्यश्री सागर यांनी केले. यावेळी विद्यार्थिनींना शालेय मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचा आणखी एक आकर्षण ठरला तो म्हणजे रंगीत पार्श्वभूमी असलेला “सेल्फी पॉईंट”. नवप्रवेशित विद्यार्थिनींनी या ठिकाणी आनंदाने फोटो काढत या विशेष दिवसाच्या आठवणी जपल्या.

या प्रवेशोत्सवानिमित्त शालेय पोषण आहारासोबत मिष्टान्नाचेही वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थिनींमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती देवरे यांनी तर आभार प्रदर्शन योगेश पाटील यांनी केले. यावेळी ज्येष्ठ विज्ञान शिक्षक नरेंद्र महाले,  दिलीप तडवी, अनिल इंदिस,  दिनेश तनपुरे, उल्हास मगरे, हिरालाल पाडवी, सुदाम माळी, संगीताबाई तांबोळी यांसह शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास देव मोगरा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतनदादा पवार, उपाध्यक्ष प्रतिभाताई मगरे, कोऑर्डिनेटर निमेश सूर्यवंशी, व संचालक महेश मगरे यांनीही शुभेच्छा देत विद्यार्थिनींना यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यालयात तयार झालेल्या स्नेहपूर्ण वातावरणात सजावट, स्वागत, सेल्फी पॉईंट व मिष्टान्न वाटपामुळे विद्यार्थिनींनी नव्या सुरुवातीचा आनंद द्विगुणित अनुभवला.

Post a Comment

0 Comments