नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिर तळोदाची कु. ओजस्वी आनंद मगरे हिचे NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यश
तळोदा :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शासना तर्फे NMMS शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केलीं जाते.या परीक्षेत नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिर तळोदाची कु. ओजस्वी आनंद मगरे ही विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाली असून तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ओजस्वी हिस वर्गशिक्षक सचिन पंचभाई व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखिया, उपाध्यक्ष दगेसिंग महाले, सचिव संजयभाई पटेल, संचालिका सोनाबेन तुरखिया, समन्वयक हर्षिल तुरखिया, मुख्याध्यापक श्री सुनील परदेशी, श्रीमती भावना डोंगरे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे कौतुकास्पद अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments