Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा शहरानजिक बिबटचा मुक्त संचार, भीतीचे वातावरण बंदोबस्ताची मागणी

 तळोदा शहरानजिक बिबटचा मुक्त संचार, भीतीचे वातावरण बंदोबस्ताची मागणी

                             तळोदा - दलेलपुर रस्त्यावर शहरापासून जवळ पहाटे पावणे सहा वाजेचे सुमारास रस्त्यावर बिबट मुक्त संचार करतांना हनुमान भक्ताला दिसला असून रोकडमन हनुमान मंदीरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. 


 तळोदा शहरातील पराग बुध्दी सागर हे शहरा लगत असलेल्या श्री हनुमान मंदीरात दर्शनाला वाहानाने जात असताना दलेलपुर रस्त्यावर बिबट फिरत असताना दिसला  बिबट चे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. दलेलपुर रस्त्यावर वर्दळ असून भाविकांची दर्शनाला जाण्याची संख्या मोठी आहे. बिबटचे दर्शन होत आहे. वनविभागाने बिबटचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे

Post a Comment

0 Comments