Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

 मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

                     

                  मोलगी (प्रतिनिधी) :-   अक्कलकुवा तालुक्याच्या मोलगी येथील मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात असून त्यांत प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरीत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून श्रावण वळवी , प्रमुख मान्यवर दिलीप वसावे, धिरसिंग वळवी, बाज्या वसावे, ब्रिजलाल पाडवी तर अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक ईश्वर वसावे होते. 


             कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्तावना शिक्षिका मनिषा वसावे यांनी केली त्यात त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा व त्यांचे महत्व पटवून दिले.


 त्यानंतर स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर शाळेचे प्राचार्य गोटुसिंग वळवी यांनी स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धकांचे कौतुक करत प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले. 


           यावेळी दिलीप वसावे, धिरसिंग वळवी व बाज्या वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक मनिषा वसावे, लीला पाडवी, प्राची पाडवी, मथुरा वसावे, शीतल वसावे व हिराबाई वळवी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे प्राचार्य गोटुसिंग वळवी यांनी तर आभार लीला पाडवी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments