Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून श्री शिव महापुराण कथेस लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ.

 पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून श्री शिव महापुराण कथेस लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ.


शहादा,दि.01

    आंतरराष्ट्रीय शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या पाच दिवसीय श्री शिव महापुराण महाकथेस लाखो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी प्रारंभ झाला.यावेळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी रामायण व महाभारतातील उदाहरणांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले.


       येथील श्री शिव महापुराण महाकथा आयोजन समितीच्या वतीने आजपासून 5 एप्रिल पावेतो आयोजित श्री शिव महापुराण कथेस प्रारंभ झाला.यावेळी समितीचे अध्यक्ष तथा शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी,सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ.शशिकांत वाणी,आयोजन समितीचे अजय गोयल,श्यामभाऊ जाधव, अजय परदेशी, गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी,मोतीशेठ जैन,रूपेश जाधव, हेमराज पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे पारंपारिक पारंपारिक नृत्य व वाद्याच्या गजरात स्वागत करण्यात आले. तदनंतर कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे व्यासपीठावर आगमन झाले.त्यांचे साधू महंतांनी उस्फूर्त स्वागत व सन्मान केला.यानंतर सुमारे तीन तास पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिव महापुराण कथेचे निरूपण केले.कथेच्या प्रारंभीच त्यांनी शहाद्याचा अर्थ विश्वास,भरोसा व दृढता असल्याचे स्पष्ट करून शहादा नगरी ही विश्वास नगरी असल्याचे सांगून भाविकांना प्रोत्साहीत केले. त्यानंतर रामायणातील लंकेत प्रभू श्रीरामाचे आगमन व महाभारतातील कौरव पांडव युद्धाचे वर्णनासह महापुराण कथेचे निरूपण केले. ते म्हणाले, भगवंताच्या कृपेनेच विश्वास दृढ होत असतो.या विश्वासातूनच शिवमहापुराण कथेसारख्या कथांचे आयोजन होत असते. विश्वास,आनंद, दृढता,भरोसा या बाबी कथा श्रवणातून आपणांस मिळत असतात. पुण्य केल्यानेच यश प्राप्ती होत असते. आपल्या मनात पुण्याच्या विचार येतो त्यातूनच मोक्षप्राप्ती होते. तीर्थस्थळ,कथा सत्संग, ईश्वरभक्ती या सर्व बाबी आपण मोक्षासाठी करत असतो असेही ते म्हणाले.ज्यावेळेस आपल्यापुढील सर्व मार्ग बंद होतात, आपण मोठ्या अडचणीत सापडतो. त्यावेळी शिवपूजनाने खरा रस्ता मिळत असतो.म्हणूनच सर्वत्र 'एक लोटा जल करे सब दुःख हल'असे म्हटले जाते.पंडित प्रदीप मिश्रा पुढे म्हणाले,संपूर्ण जगाला शनीची अवकृपा लागते.मात्र शनीला शंकर लागत असतो. बेलपत्र,पंचाक्षर मंत्र,सप्ताक्षर जप केला तर सर्वांनाच भगवान शंकरजींचा आशीर्वाद प्राप्त होईल.आपला भगवंतावर विश्वास असेल तरच कथेला येण्यात अर्थ आहे. जीवनात दुःख भरपूर आहे,मात्र सोबत शिवजींची कृपा असेल तर चिंता करण्याचे कारण नाही. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र भूमीत आणि शहादा या विश्वास नगरीत होत असलेल्या श्री शिव महापुराण कथेस मोठा जनसमुदाय लोटला असल्याने आपण भारावलो असल्याचे त्यांनी सांगितले. या महाकथेस पहिल्या दिवशी सुमारे तीन लाखापेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती होती. सकाळपासूनच शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते. दुचाकी,तीन चाकी, चार चाकी वाहनांसह पायी भाविक मोहिदा तश  शिवारातील कथास्थळी जात असल्याचे चित्र सर्व दूर दिसत होते. नंदुरबार व शहादा पोलिसांनी जागोजागी बॅरिकेट्स उभारून वाहतूक नियंत्रण केले होते.पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणात कथेला सुरुवात झाली असून वातावरणातील उष्मा त्यामुळे कमी झाला होता. कथे दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांनी कॅन्सरने चौथ्या स्टेजला पीडित असलेल्या मात्र या जिवघेण्या आजारावर मात केलेली महिला, 30 वर्षानंतर पुत्र प्राप्ती झालेली महिला व बालक आणि सर्व शारीरिक क्रिया बंद झाल्यानंतर शिवभक्तीने आजारातून बऱ्या झालेल्या युवकास मंचावर आमंत्रित करून भगवान शिव शंकराच्या आशीर्वादाने यांना लाभ झाल्याचे उपस्थित भाविकांसमोर जाहीर केले.

Post a Comment

0 Comments