Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राज्य लॅक्रोस स्पर्धेसाठी नंदुरबार संघ रवाना आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून शुभेच्छा

 राज्य लॅक्रोस स्पर्धेसाठी नंदुरबार संघ रवाना ; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून शुभेच्छा

                         नंदुरबार :- पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय लॅक्रोस स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघ रवाना झाला. यावेळी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना खेळ क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अधिकाधिक मदत करण्याचे आवाहन करुन सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

                                   महाराष्ट्र लॅक्रोस असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा लॅक्रोस असोसिएशनच्यावतीने १४ व १५ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय लॅक्रोस स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा लॅक्रोस संघ रवाना झाला आहे. या स्पर्धेत सबज्युनिअर, ज्युनिअर आणि सीनियर गटांतील मुले, मुली, पुरुष आणि महिलांचे सामने खेळविण्यात येणार आहेत. संघाच्या रवाना प्रसंगी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, जिल्हा लॅक्रोस संघटनेचे अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, क्रीडाशिक्षक डॉ. मयुर ठाकरे, मिनलकुमार वळवी, सचिव भरत चौधरी, रुपेश महाजन व राजेश्वर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

१७ वर्षा आतील मुलांच्या संघात निखिल चौरे, दुर्गेश तवर, लवेश वाघ, वेदांग चौधरी, मानव चकोर, सोहम कोळी, अंश भारती, स्वरित चौधरी, नैतिक धनगर, सहर्ष गांगुर्डे, हर्षल माळी, तुषार कोळी, ईशांत पाटील, गिरीष पाटील, अनुज काळे. १९ वर्षा आतील मुलींच्या संघात कन्या मराठे, कृष्णाली बिर्ला , राजनंदिनी पाटील, अक्षरा कापडिया, मृणालिनी पाडवी, अंकिता चव्हाण, राजश्री राठोड. १९ वर्ष आतील मुलांच्या संघात-राजेश माळी, गौरव माळी, ओम मराठे, हर्षल बेडसे, रोहित पगारे, तेजस चौधरी, ओम पवार, मयूर पाटील, कुणाल धनगर, जतिन वाडीले, श्याम पाटील, हर्षल नेतके, ओम ठोसर, गौरव चौधरी, मनीष गोयकर या सर्व खेळाडूंचा पुणे येथे होणार्‍या स्पर्धेत सहभाग आहे.

Tags

Post a Comment

0 Comments