Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सारथी फाउंडेशन तर्फे 1751 हनुमान चालीसा वाटप..

 श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सारथी फाउंडेशन तर्फे 1751 हनुमान चालीसा वाटप..

                            तळोदा :--श्री हनुमान जन्मोत्सवाच्या मंगल प्रसंगी तळोद्यातील जागृत देवस्थान असलेले श्री रोकडमन हनुमान मंदिर या ठिकाणी "सारथी फाऊंडेशन" च्या वतीने सर्व हनुमान भक्तांना 1751 हनुमान आरती व चालीसा संग्रहाचे वाटप करण्यात आले. तळोदा शहरांमध्ये मागच्या वर्षी एकाच छताखाली सर्व आरोग्य सुविधा पुरवणे व वारंवार जिल्ह्याच्या ठिकाणी धावपळ करावी लागू नये या उद्देशाने स्वस्तिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले. 

                             वर्षभर एक उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा संकल्प पूर्ण झाल्या कारणाने भाविकांना श्री.हनुमान चालीसाचे वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये आरोग्य शिक्षण व स्थानिक संस्कृती याचा योग्य प्रचार होण्यासाठी आज सारथी फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली. सारथी फाउंडेशन यापुढे सामाजिक कार्यात अनेक कार्यक्रम राबवण्याचे प्रयत्न करणार आहे. सारथी फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य व मार्गदर्शक  समाधान लोखंडे व सुभाषचंद्र जैन यांच्या हस्ते पहिली पत्रिका श्री रोकड हनुमान यांना अर्पण करण्यात आली. भक्तिमय वातावरणात मंदिराचे सेवेकरी श्री. दद्दू  दुबे, योगेश चव्हाण, विकास माळी व त्यांचे सर्व सहकारी त्याबरोबर स्वस्तिक हॉस्पिटल चे संस्थापक डॉ.संदीप जैन, डॉ.महेश मोरे व डॉ.सुनील लोखंडे यांच्याहस्ते "सारथी फाऊंडेशन" चे उद्घाटन करण्यात आले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सारथी फाऊंडेशन कडून. समाधान लोखंडे,  सुभाष चंद्र जैन, डॉ . जगदीश पाटील, डॉ.राजेंद्र आगळे, डॉ.प्रदीप गोयर,डॉ.सुमित वाणी, डॉ.तुषार पटेल, डॉ.राहुल मोरे, डॉ.दुष्यंत शिवदे, अर्जुन चांदेले,रवी चव्हाण,पलाश जैन, गुड्डू जिरे, सुभाष वळवी ,सोहेल मन्सूरी, मोईन मन्सूरी, गणेश चव्हाण, नदीम अन्सारी व राकेश भोई हे उपस्थित होते. सारथी फाऊंडेशन यापुढे सातपुड्यातील आरोग्यशिक्षण, सिकल सेल,क्षयरोग, कुष्ठरोग, कुपोषण मुक्तीसाठी काम करेल.

Post a Comment

0 Comments