Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन च्या नंदुरबार -धुळे जिल्हा कमिटीच्या वतीने शेतमजूर महिला परिषद*

 *महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन च्या नंदुरबार -धुळे जिल्हा कमिटीच्या वतीने शेतमजूर महिला परिषद*


                               तळोदा तालुक्यातील गुंजाळी येथे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन च्या नंदुरबार -धुळे जिल्हा कमिटीच्या वतीने शेतमजूर महिला परिषद    आयोजन करण्यात आली. 

   


               महिला परिषदेस प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून संघटनेच्या केंद्रीय समिती सदस्या कॉ. सरिता खंदारे, संघटनेचे राज्याध्यक्ष कॉ. मारोती खंदारे, संघटनेचे जेष्ठ नेते कॉ. नथूभाऊ साळवे, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. सुनील गायकवाड, पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. शामसिंग पाडवी , संघटनेचे व पक्षाचे जिल्हा सचिवमंडळ सदस्य कॉ. अनिल ठाकरे, कॉ. रुबाबसिंग ठाकरे , कॉ. नारसिंग वसावे , कॉ. संतोष गायकवाड , कॉ. अनिल शिरसाठ, कॉ.राजाराम ठाकरे , कॉ. सनु न्हावे, यासह शेकडो महिला धनपुर, गुंजाळी , भगदरी , शिरुड , समशेरपुर ,गावातून उपस्थित होत्या.  

    


                        यावेळी महिला परिषदेला संघटनेच्या नेत्या कॉ . सरिता खंदारे, संघटनेचे राज्याध्यक्ष कॉ. मारोती खंदारे , संघटनेचे जेष्ठ नेते कॉ.नत्थु भाऊ साळवे, कॉ.हर्षदा साळवे आदींनी संबोधित केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉ .रविता ठाकरे यांनी काम पाहिले तर सूत्रसंचालन कॉ.सुनील गायकवाड यांनी केले . 

            


                     कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुंजाळी गावातील तरुणांनी विशेष सहकार्य केले, याबद्दल युनियनने  सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments