Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कायदा, सुव्यवस्था राखत येणारे सण-उत्सव साजरे करावेत. - पोलीस उपविभागीय अधिकारी दर्शन दुग्गड तळोदा पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

कायदा, सुव्यवस्था राखत येणारे सण-उत्सव साजरे करावेत.                                 - पोलीस उपविभागीय अधिकारी दर्शन दुग्गड

 तळोदा पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन







तळोदा, :- हिंदु-मुस्लिम बांधवांनी कुठलाही सण साजरा करताना एकोपा ठेवावा. सर्वांनी कायदा, सुव्यवस्था राखत येणारे सण-उत्सव साजरे करावेत. सर्व समाज बांधवांनी सोशल मीडियावर व्हायरल मेसेज, व्हिडिओ कडे दुर्लक्ष करावे आणि त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास याबाबत पोलिसांना कळवावे असे प्रतिपादन पोलीस उपविभागीय अधिकारी दर्शन दुग्गड यांनी केले.


तळोदा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशनच्या परिसरात तळोदा पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी दर्शन दुग्गड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, मौलाना शोएब रजा नुराणी, अमोनोद्दीन शेख, निसार मक्राणी, अक्रम पिंजारी, कलीम अन्सारी, आरिफ नुरा, युनुस अन्सारी, शेख उमराव हाजी सरदार, रझ्झाक पठाण, रौफ अन्सारी, अँड. मेहमूद, सुलतान शेख, उशीर मिस्त्री, मुस्ताक शेख आदी उपस्थित होते.


 यावेळी निसार मक्राणी यांनी सांगितले की, चांगल्या दृष्टिकोनातून बघितले तर कोणीच वाईट दिसत नाही. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमाजन निमित्ताने होणारी इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. रमजान महिना मुस्लिम समाज बांधवांसाठी महत्वपूर्ण असा सण आहे. या महिन्यात दान करण्याची पद्धत असून दान केल्याने माणसाला आत्मिक बल व समाधान मिळते. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार, अजय पवार, अजय कोळी, श्री. मगरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments