Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोद्यात पंडित प्रदीप मिश्रा यांची शोभायात्रात सहभागी व्हावे - आ. राजेश पाडवी यांचे आवाहन

तळोद्यात पंडित प्रदीप मिश्रा यांची शोभायात्रात सहभागी व्हावे - आ. राजेश पाडवी यांचे आवाहन 




                           शहादा येथील श्री शिव महापुराण कथा निमित्त आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते पंडित प्रदीप मिश्राजी सिहोर वाले यांचे आगमन तळोदा शहरात होणार आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांचे भाविकांना जवळून दर्शन व्हावे म्हणून सोमवारी सायंकाळी 5 वाजता तळोदा नगरीत भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहून दर्शन व शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष आमदार राजेश पाडवी यांनी केले आहे.  याप्रसंगी समितीचे सदस्य डॉ शशिकांत वाणी, अजय परदेशी, गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, जगदीश परदेशी,  शिरीष माळी,  आदी उपस्थित होते. पंडित प्रदीप मिश्रा यांनी भव्य मिरवणूक श्री दत्त मंदिरा पासून प्रारंभ होईल व भगवान बिरसा मुंडा चौकात समारोप होईल.

Post a Comment

0 Comments