Type Here to Get Search Results !

जागतिक क्षयरोग दिवस निमित्त तळोद्यात जनजागृती एलईडी वाहनाचे उद्घाटन



 जागतिक क्षयरोग दिवस निमित्त तळोद्यात जनजागृती एलईडी वाहनाचे उद्घाटन

तळोदा :- दिनांक २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा केला जातो रॉबर्ट कॉक नावाच्या शास्त्रज्ञाने २४ मार्च १८८२ साली जागतिक पातळीचा शास्त्रज्ञांपुढे क्षयरोग हा मायक्रोबॅक्टीरियम ट्यूबरकिलोसिस नावाच्या जंतुने होणारा संसर्गजन्य आजार आहे. हे विधान सिद्ध करून दाखवले त्यामुळे हा दिवस जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानुषंगाने जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग उच्चाटनासाठी जनजागृती व्हावी या उद्दिष्टाने एलईडी वाहन ज्याद्वारे क्षयरोगाची गावोगावी जनजागृती करण्यात येणार आहे. त्या वाहनाचे उद्घाटन गटविकास अधिकारी किरवे यांच्या हस्ते पंचायत समितीच्या आवारात करण्यात आले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी यांनी वाहनाचे पूजन केले. उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहित वसावे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पटले व डॉ. कैलास ठाकरे यांनी श्रीफळ फोडून उद्घाटन केले. ७ डिसेंबर २०२४  रोजी शंभर दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यात सर्व अति जोखमेच्या व्यक्तींची दर्जात्मक एक्स-रे मशीन व ट्रू नेट मशीन च्या सहाय्याने तपासणी करून जास्तीत जास्त क्षय रुग्ण शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणण्यात आले. त्याची आज सांगता झाली. सदर एलईडी वाहन हे तालुक्यात पाच दिवस पूर्ण खेडोपाडी जाऊन जनजागृती करणार आहेत. सदर कार्यक्रमास कौस्तुभ बडोदेकर वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक,  बाळू पाटील वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, श्रीमती हेमलता वळवी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, श्रीमती भारती कापडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, श्रीगौतम वळवी औषध निर्माणाधिकारी, वाघ आरोग्य विस्तार अधिकारी, दिलीप पाटील आरोग्य पर्यवेक्षक, राठोड आरोग्य सेवक, बावा हिवताप पर्यवेक्षक,  बी . जे.वळवी आरोग्य सहाय्यक, गिरासे कनिष्ठ लिपिक, सागर बैसाणे डाटा एन्ट्री ऑपरेटर, हितेश गांगुर्डे अकाउंटंट, राहुल सूर्यवंशी, सचिन बच्छाव एक्स-रे टेक्निशन कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments