Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आदर्श आश्रमशाळेच्या 5 वी प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा

 आदर्श आश्रमशाळेच्या 5 वी प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा


                  नंदुरबार, दिनांक 27 मार्च, 2025 (जिमाका) :-

नवापूर तालुक्यातील आदर्श आश्रमशाळा (देवमोगरा) येथे शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी इयत्ता 5 वीच्या प्रवेशासाठी 13 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत शासकीय आश्रमशाळा शिर्वे, ता. तळोदा येथे स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याचे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी के. सी. कोकणी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत असणाऱ्या तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील इयत्ता 4 थी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.  भाषा व सामाजिक शास्त्र (32 गुण), गणित (32 गुण) आणि बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान (36 गुण) एकूण 100 गुण या अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे.


महत्त्वाच्या सूचना:

• पालकांनी आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर आधार कार्डसह एक तास आधी हजर करावे.

• ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयात प्राप्त झाले आहेत, तेच विद्यार्थी परीक्षेला बसू शकतील.

• विद्यार्थ्यांनी फक्त एक पेन, पाण्याची बाटली आणि आवश्यक साहित्य आणावे.

• गैरकृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना परिक्षेतून अपात्र ठरवण्यात येईल.


Post a Comment

0 Comments