Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सहारा वेल्फेअर व निरंकार शिक्षण प्रसारक मंडळाचा सामाजिक उपक्रम गरजू मुलांना उबदार कपड्यांचे वाटप

 सहारा वेल्फेअर व निरंकार शिक्षण प्रसारक मंडळाचा सामाजिक उपक्रम

गरजू मुलांना उबदार कपड्यांचे वाटप


तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो 

हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजू व दुर्बल घटकांतील मुलांना मदतीचा हात देण्यासाठी सहारा वेल्फेअर सोसायटी व निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा येथे उबदार कपड्यांचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे थंडीच्या दिवसांत अनेक मुलांना मोठा दिलासा मिळाला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.भाईसाहेब गो. हू. महाजन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. श्री. अमरदीप अरुणकुमार महाजन उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी समाजातील गरजू मुलांसाठी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. शिक्षणसंस्था व सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


कार्यक्रमादरम्यान अनेक गरजू मुलांना उबदार कपड्यांचे वितरण करण्यात आले. थंडीच्या दिवसांत मिळालेल्या या मदतीमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून आले. समाजातील गरजू घटकांना मदत करणे हे सामाजिक कर्तव्य असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास शब्बीर मन्सुरी (अध्यक्ष, सहारा वेल्फेअर सोसायटी, तळोदा), सुनील सूर्यवंशी (उपमुख्याध्यापक, गो. हू. महाजन हायस्कूल, तळोदा), अंबरीश सूर्यवंशी (पर्यवेक्षक), प्रा. नितीन शिंपी, नरेंद्र माळी व निलेश सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे शिस्तबद्ध व प्रभावी सूत्रसंचालन डी. पी. सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम शांततेत व सुव्यवस्थितपणे पार पडला. हा उपक्रम सामाजिक ऐक्य व माणुसकीचा संदेश देणारा ठरल.

Post a Comment

0 Comments