नेमसुशिल विद्यामंदिरात नृत्याविष्कारच्या माध्यमातून हर्षोत्सवाचे आयोजन
तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो
तळोदा शहरातील नेमसुशिल शैक्षणिक संस्थेत नृत्याविष्काराच्या माध्यमातून हर्षोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सलग 3 दिवस चालणाऱ्या या हर्षोत्सवात 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध नृत्याविष्कार सादर केले.
यात वैयक्तिक नृत्य समूह नृत्य देशभक्ती नृत्य,समाज प्रभोधन नाटिका, लोककलेवर आधारीत लावणी, स्त्री सक्षमीकरण, बाल कामगार, मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, लग्नातील पारंपरिक प्रथा,शिव तांडव, ऍसिड हल्ला ,आदिवासी नृत्य अशा विविध विषयांवर आविष्कार सादर करण्यात आले. यावेळी रसिक प्रेक्षकांनी कलाकार विद्यार्थ्यांना भरपूर दाद दिली.
प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बागुल यांच्या संकल्पनेतून लोप पावत चाललेला व्यवसाय सुया पोत विक्री करणारी स्त्री तनिष्का कलाल ह्या विद्यार्थिनीच्या माध्यमातून सादर करण्यात आला. परिसरात भव्य सेल्फी पॉईंट व संस्था समनव्यक हर्षिल तुरखीया यांची रांगोळी प्रमुख आकर्षणचा विषय ठरला यावेळी खाऊगल्लीचे देखील आयोजन करण्यात आले .
कार्यक्रम प्रसंगी परिक्षक म्हणून गोविंद सामुद्रे अंकिता वर्मा मुकेश गायकवाड दर्शना जमदाडे दिपाली कलाल भूमिका बच्छाव यांनी कामकाज पाहिले अनुक्रमे प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष निखीलभाई तुरखीया संचालिका सोना तुरखीया उपाध्यक्ष डी.एम महाले सचिव संजयभाई पटेल मोती बँक मॅनेजर विजय वाणी, वसंत पाटील, मॅनेजर नितीन वाणी, संस्था समनव्यक हर्षिल तुरखीया,अर्जुनभाई अम्मीभाभी मयूरभाई ,सुनिल मराठे, मुख्या.पुष्पा बागुल, प्राचार्य सुनिल परदेशी, प्रिन्सिपल पी.डी.शिंपी, मुख्या.भावना डोंगरे, मुख्या.गणेश बेलेकर आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण कुवर, रेखा मोरे, कल्याणी वडाळकर, रविंद्र गुरव, प्रतिभा बैसाने, दिपाली पाटील, धरती पाटील, अक्षता बारी, गौरी शिंपी, अनुष्का यांनी केले.हर्षोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विद्यामंदिरातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






Post a Comment
0 Comments