प्रा. गो. हु. महाजन हायस्कूल येथे विद्यार्थी, पालकांना विविध जातींची रोप व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
तळोदा येथील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूल, श्री शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालय तसेच प्रिन्सिपल भाईसाहेब जी. एच. महाजन इंग्लिश मिडीयम स्कुल व सावित्रीबाई फुले प्रणित श्री. सुपडू वना माळी प्राथमिक विद्यामंदिरात आज सोमवारी (ता. १६) शैक्षणिक वर्षाचा प्रथम दिनानिमित्त विद्यार्थी, पालकांना विविध जातींची रोप व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी प्राचार्य अमरदिप महाजन, उपमुख्याध्यापक साहेबराव खैरनार, इंग्लिश विभाग प्रमुख शितल महाजन, मुख्याध्यापिका वंदना माळी, इंग्लिश मिडीयमचे प्राचार्य गौरव सूर्यवंशी, पर्यवेक्षक अरुण महाजन, पर्यवेक्षक अंबरीश सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक हर्षल महाजन, विज्ञान विभाग प्रमुख नितीन शिंपी, कला विभाग प्रमुख संदीप मगरे, ज्येष्ठ शिक्षक पंकज मगरे, पंडित वळवी तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम कै. प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन (बाबाजी) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन व अभिवादन करून बाबाजींच्या, माईंसाहेब, सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तकांचे वाटप देखील करण्यात आले. तसेच प्राचार्य अमरदीप महाजन यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी व पालकांना विविध वृक्षांची रोपे देण्यात आलीत व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या अनोख्या प्रवेशोत्सवाची सर्वत्र चर्चा होत आहे.
याप्रसंगी प्राचार्य अमरदीप महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, यावर्षी देखील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आलेल्या रोपांचे चांगल्या पद्धतीने संगोपन व संवर्धन करावे. कारण निसर्ग वाचला तर आपण वाचू असे सांगत त्यांनी नूतन शैक्षणिक वर्षांसाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात. उपमुख्याध्यापक साहेबराव खैरनार यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सशिल पाडवी यांनी सूत्रसंचालन केले. सुनिल सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments