Type Here to Get Search Results !

नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

 नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत 

                  तळोदा - शहरातील नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी संस्था अध्यक्ष निखीलभाई संचालिका सोनाभाभी उपाध्यक्ष डी एम महाले संस्था समनव्यक हर्षिलभाई तुरखीया आदी मान्यवर उपस्थित होते.

                      यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण करून प्रवेश देण्यात आला प्रसंगी मुख्या. श्रीमती पुष्पा बागुल यांच्या संकल्पनेतून इयत्ता 1 ली मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे  पहिल्या दिवसाचा मी त्यात  बालकांचे पहिल्या दिवसाचे फोटो संकलन करून प्रदर्शन भरविण्यात आले.


 प्रसंगी विद्यामंदिरातील शिक्षिका योगिता सोनवणे यांनी विद्येची आराध्य दैवत सरस्वती यांची वेशभूषा साकारली. मान्यवरांच्या हस्ते विद्यामंदिरात प्रथम प्रवेशित, वाढदिवस धारक यांना भेटवस्तू देण्यात आले.

                         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल मुख्या. गणेश बेलेकर मुख्या.श्रीमती अर्चना पाडवी संदिप चौधरी देवेंद्र शिंपी अरुण कुवर चंद्रकांत भोई सचिन पाटील  कमलेश पाटील सागर मराठे सुदाम मुजगे प्रतिभा गुरव रुख्मिणी खर्डे अश्विनी भोपे राजेश मराठे अंकित डोंगरे संगीता पटेल अल्का पाडवी श्रीमती कलाल अश्विनी पाटील आदिंनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments