Type Here to Get Search Results !

नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा आरोग्य सेवा व पाणीपुरवठा संदर्भातील दौरा

 नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा आरोग्य सेवा व पाणीपुरवठा संदर्भातील दौरा

              नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी अक्राणी तालुक्यातील विविध आरोग्य सेवा केंद्रे व ग्रामस्तरावरील यंत्रणा यांचा प्रत्यक्ष दौरा करून नागरिकांच्या आरोग्य सुविधा, उपलब्ध कर्मचारी, व पाणी समस्यांचा आढावा घेतला.

प्राथमिक आरोग्य केंद्र झापी येथे भेट देऊन जिल्हाधिकारी महोदयांनी पाणीपुरवठ्याची अडचण आणि आरोग्य सुविधा याबाबत डॉक्टरांना मार्गदर्शन केले. रुग्णसेवेतील कमतरता, स्वच्छता आणि नियमित उपस्थितीबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच स्थानिक रहिवासींच्या समस्या समजून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजने बाबत सूचना दिल्या.

बादल ग्रामपंचायत येथे भेट देऊन जिल्हाधिकारी यांनी CHO (Community Health Officer) हे खरोखरच नियमित भेट देतात का, याची चौकशी केली व ग्रामस्थांच्या अभिप्रायावर आधारित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

फलई अंगणवाडी केंद्र येथे भेट देऊन तेथील बालकांची उपस्थिती, आहार व शिक्षण सुविधा याची पाहणी करण्यात आली. अंगणवाडी सेविकांसोबत संवाद साधून शासनाच्या योजनांची अंमलबजावणी तपासली.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र खडकी येथे भेट देऊन डॉक्टरांची उपलब्धता, औषधसाठा, व आरोग्य तपासणी सेवा यावर चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक लोकांच्या आरोग्य गरजा समजून घेऊन सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

तोरणमाळ ग्रामीण रुग्णालय येथे जिल्हाधिकारी यांनी Nutrition Rehabilitation Centre (NRC) ची पाहणी केली. अल्पवजन बालकांची तपासणी, उपचार व आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.

पाणी प्रक्रियागृह बद्दल (Water Treatment Plant) पाण्याची शुद्धता, साठवण क्षमता व वितरण यंत्रणा चौकशी केली. स्थानिक गावांतील पाणीटंचाई संदर्भात आवश्यक कामकाज सुरु करण्याच्या सूचना पाणीपुरवठा अभियंता यांना दिल्या.

 या दौऱ्याद्वारे प्रशासनाचे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि सुरक्षित पाणीपुरवठा पोहोचविण्याचे उद्दिष्ट स्पष्ट झाले . जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना कार्यक्षमता वाढवण्याचे व नागरिकाभिमुख सेवा पुरवण्याचे निर्देश दिले.

.

.

.

#NutritionRehabilitationCenter #अंगणवाडीविकास #सुरक्षितपाणी #RuralHealthCare

#PublicHealthMission #WaterForAll #NandurbarDistrict #GovernmentInAction #CHOservices #HealthInfrastructure

Post a Comment

0 Comments