Type Here to Get Search Results !

तेराशे भांडे संच तळोद्यात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते वाटप.

 तेराशे भांडे संच तळोद्यात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते वाटप 


                            तळोदा :-  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आयोजित भांडे वाटप कार्यक्रम कलाल गल्ली, तळोदा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष आमदार राजेश पाडवी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

                     या प्रसंगी भाजप प्रदेश सदस्य शशिकांत वाणी, नेहा राजेश पाडवी, नीलाबेन मेहता, अनिता कलाल, ॲड. मनिषा बिरारी, भारतीय जनता पार्टी तळोदा शहराध्यक्ष गौरव वाणी, तालुका अध्यक्ष दरबार पाडवी, तसेच विलास डामरे, जितेंद्र सूर्यवंशी, जगदीश परदेशी, शहादा-तळोदा विधानसभा प्रभारी कैलास चौधरी, सुभाष चौधरी, गोकुळ मिस्तरी, अंबालाल साठे, दीपक कलाल, अनिल परदेशी, गोविंद पाडवी, योगेश, सचिन, उदासी पाडवी, रामा पाडवी, योगेश महाजन, शिरीष माळी, भैय्या चौधरी यांची उपस्थिती होती.

                      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमन जोहरी, चिंतामण जोहरी, नंदू जोहरी, शुभम जोहरी, सनी जोहरी, रामप्रसाद पाडवी यांनी मेहनत घेतली.


कार्यक्रमाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आवश्यक असलेले भांडे व उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आणि आमदार राजेश पाडवी यांचे आभार मानले.


तळोदा गावातील घरकुलांच्या बारगडी जहागीरदारी नाव असलेल्याचे प्रलंबित प्रश्न फक्त राजेश  पाडवीच मिटवू शकतात. असे यावेळी बोलताना राजेश पाडवी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments