Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

विकसित कृषी संकल्प अभियान 2025 अंतर्गत मोरवड येथे शेतकरी सक्षमीकरणासाठी सभा संपन्न

 विकसित कृषी संकल्प अभियान 2025 अंतर्गत मोरवड येथे शेतकरी सक्षमीकरणासाठी सभा संपन्न 

            नंदुरबार जिल्ह्यातील मौजे मोरवड येथे "विकसित कृषी संकल्प अभियान 2025" अंतर्गत भव्य शेतकरी सभा उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थित पार पडली.


                            कार्यक्रमास विशेष मार्गदर्शनासाठी कृषी महाविद्यालय, नंदुरबार येथील अधिष्ठाता प्रा. यु. बी. होले,  डॉ. पारितोष कुमार (NIASM),  यु. डी. पाटील (SMS, KVK), तसेच  तालुका कृषी अधिकारी श्रीम. एम. के. वळवी हे उपस्थित होते.

                          या सभेचा उद्देश शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, शाश्वत शेती उपाययोजना, आणि सरकारच्या विविध कृषी योजनांची माहिती देणे हा होता.

                    सभेत आधुनिक बियाणांची निवड आणि प्रक्रिया, हवामानाशी सुसंगत पिकांचे नियोजन,  ठिबक सिंचन व पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे महत्त्व,विषयावर मार्गदर्शन झाले. 

कार्यक्रमास मोरवडचे आप  जितेंद्र पाडवी, सरपंच श्रीम. अक्षता वासुदेव वळवी, चौगाव बु. येथील सरपंच येड्या दादा ठाकरे यांनी प्रमुख उपस्थिती दिली.


कार्यक्रम उप कृषी अधिकारी एस. डी. दाणी, सहाय्यक कृषी अधिकारी  एस. बी. पाडवी,  डी. सी. पावरा, श्रीम. सोनी, श्रीम. एन. एम. पावरा, श्रीम. गावित आदी उपस्थित होते.


निष्कर्ष:

"विकसित कृषी संकल्प अभियान 2025" अंतर्गत आयोजित हा कार्यक्रम शेतीच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरला, असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले. नवनवीन उपाययोजनांचा वापर करून अधिक उत्पादन व शाश्वत शेती साध्य होऊ शकते, हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.


शेतकरी सहभागानेच जिल्हा कृषी समृद्धीच्या दिशेने वाटचाल करेल.

.

.

.

#कृषीविकास #शेतकरीसभा #नविनतंत्रज्ञान #NandurbarAgriculture #VikasitKrushiSankalp #KrushiMargdarshan #RajeshDadaPadvi #MorvadEvent

Post a Comment

0 Comments