गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर आणि ॲग्रिगेटर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी
मित्ताली सेठी
नंदुरबार, दिनांक 08 एप्रिल, 2025 (जिमाका) :
केंद्र शासनाने गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर आणि ॲग्रिगेटर यांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले असून जिल्ह्यातील अशा सर्व कामगारांना या पोर्टलवर नोंदणी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
साधारणपणे गिग व प्लॅटफॉर्म वर्कर म्हणजे मागणीनुसार काम करणारे कामगार. यामध्ये अन्न व किराणा पुरवठा करणारे कामगार, लॉजिस्टिक्स सेवा देणारे कामगार, ई-मार्केटिंगचे ऑनलाईन काम करणारे कामगार, प्रोफेशनल सर्व्हिस देणारे कामगार, हेल्थ केअर सेवा देणारे कामगार, ट्रॅव्हल व आदरातिथ्य करणारे कामगार, मीडिया सर्व्हिसेस इत्यादी क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश होतो.
याव्यतिरिक्त, अमॅझोन, फ्लीपकार्ड, मित्रा, स्नॅपडील, अजिओ, मिशो, स्विगी, झोमॅटो अशा वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार हे सर्व ई-श्रम (eshram.gov.in) या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. केंद्र सरकारकडे या डेटाचा तपशील तयार होत असून, गिग कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणे तसेच डिजिटल मध्यस्थी म्हणून काम करणारे सर्व सेवा पुरवठादार यांनी ॲग्रिगेटर म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.
यासाठी सर्व संबंधित ॲग्रिगेटर यांनी तातडीने register.eshram.gov.in/#/user/platform-worker-registration या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
Post a Comment
0 Comments