भाजपाच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त तळोद्यात भारत मातेचे पूजन व झेंडावंदन कार्यक्रम
तळोदा : दि. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा ४५ वा स्थापना दिन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रा. विलासजी डामरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात भारत मातेचे पूजन करून, पंडित दीनदयाल उपाध्याय यांना माल्यार्पण करण्यात आले व भाजपाचा झेंडा फडकवून मानवंदना देत पेढे वाटप करून साजरी करण्यात आला.
या वेळी प्रा. विलास डामरे, सुरेश माळी, कलीम अन्सारी, योगेश मराठे, अंबालाल साठे, श्रावण तिजवीज, शैलेंद्र अहिरे, जीवन अहीरे, संजय वानखेडे, संदीप साळी आणि गोलु बारी आदी मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments