मोड येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची तालुका कमिटीची बैठक संपन्न
तळोदा तालुक्यातील मोड येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची तालुका कमिटीची बैठक पार पडली. सर्वप्रथम शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येऊन बैठकीची रीतसर सुरुवात करण्यात आली. मागील कार्याचा आढावा, 30 एप्रिल रोजी जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा व सह्यांची मोहीम , लेव्ही व नूतनीकरण अश्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर लेव्हीं जमा करावी अश्या सूचना सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना देण्यात आल्या .
दिनांक 11 एप्रिल रोजी तळोदा बायपास रोडवरील आदिवासी सामाजिक भवनात सर्व धर्मनिरपेक्ष , लोकशाही संविधान मानणाऱ्या पुरोगामी पक्षांच्या तसेच सर्व सामाजिक जनसंघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आजच्या पक्षाच्या बैठकीत ठरवण्यात आली होती. 30 एप्रिल जनाक्रोष मोर्चा यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त रात्रीच्या बैठका घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. यावेळी 17 सदस्यांपैकी 14 सदस्य बैठकीस उपस्थित होते. यामध्ये तालुका सचिव कॉ.अनिल ठाकरे , यासह कॉ.रुबाबसिंग ठाकरे , कॉ.सुदाम ठाकरे , कॉ.दयानंद चव्हाण , कॉ.कैलास चव्हाण, कॉ.सुभाष ठाकरे, कॉ.तुळशीराम ठाकरे, कॉ.देविसिंग पाडवी , कॉ. अंबालाल गुरव , कॉ.रामदास मोवाशी, कॉ. उखड्या ठाकरे , कॉ.रमण पवार , कॉ. सुबडीबाई पाडवी , कॉ. ओमानिबाई वसावे इत्यादी सदस्य उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments