Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

दुग्ध विकास योजनेतील लाभार्थ्यांना न्याय मिळविण्यासाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे लेखी आश्वासन नंतर उपोषण मागे

 दुग्ध विकास योजनेतील लाभार्थ्यांना न्याय मिळविण्यासाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे लेखी आश्वासन नंतर उपोषण मागे


                          तळोदा (जि. नंदुरबार) : दुग्ध विकास योजनेतील लाभार्थ्यांना न्याय मिळविण्यासाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे गेल्या तीन दिवसापासून उपोषण सुरू होते. लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आल्या नंतर उपोषण मागे घेतले.

तळोदा येथील आदिवासी विकास प्रकल्पा समोर उपोषण सुरू होते. सहाय्यक प्रकल्प अधिकारी गायकवाड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी के. सी. कोकणी आणि कार्यालयीन अधीक्षक शितल कुमार वळवी यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र दिले आहे. यामध्ये निश्चित कालमर्यादेत कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट नमूद केले आहे.

 आंदोलनकर्ते ॲड. गणपत पाडवी (महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता, आदिवासी युवा संघटना),उमेश वसावे (जिल्हा उपाध्यक्ष), सुभाष नाईक (जिल्हा उपाध्यक्ष), मुकेश पाडवी (तालुका संपर्कप्रमुख), जय पाडवी (सल्लागार) अश्विन पाडवी, सुरेश पाडवी आदींनी या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. आंदोलन मागे, पण लढाई संपलेली नाही. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी, जर ठरलेल्या वेळेत चौकशी झाली नाही आणि दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

       

Post a Comment

0 Comments