Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रि-शताब्दी जन्मवर्षानिमित्तव्याख्यानाचा कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रि-शताब्दी जन्मवर्षानिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रि-शताब्दी जन्मवर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तळोदा प्रखंड यांच्या संयुक्त विद्यमाने वृंदावन वाडी येथे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.                               


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व व्याख्यानाचे मार्गदर्शक म्हणून वि. का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळ, धुळे येथील  श्रीपाद नांदेडकर हे होते. तर अध्यक्षस्थानी तळोदा किराणा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष सुभाषभाई जैन हे होते. श्रीपाद नांदेडकर यांनी सुरुवातीला शिवकालीन इतिहास व पेशव्यांचा इतिहास थोडक्यात सांगितला. त्यांनी आपल्या व्याख्यानात अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या जीवनातील विविध घटनांचा क्रम श्रोत्यासमोर मांडला. 

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख अतिथी श्रीपाद नांदेडकर यांचा सत्कार बजरंग दल तळोदा प्रखंड संयोजक अजय ठाकरे यांनी केला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष  सुभाषभाई जैन यांचा सत्कार विहिप तळोदा प्रखंड उपाध्यक्ष दीपक नाना चौधरी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विहिप तळोदा प्रखंड कोषाध्यक्ष प्रा. डॉ. स्वप्नील वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन विहिप तळोदा प्रखंड मठ मंदिर प्रमुख आनंद मराठे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचा परिचय विहिप तळोदा प्रखंड अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विहिप तळोदा प्रखंड मंत्री हृषिकेश बारगळ, सत्संग सहप्रमुख. छोटूलाल प्रजापती, प्रखंड मठ मंदिर सहप्रमुख  नितीन मगरे, विशेष संपर्क प्रमुख मानसिंग गिरासे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments