अवैध लाकुड जप्त बिलगांव व अक्राणी वनविभागाची धडक कारवाई
सहाय्यक वनसंरक्षक (परीविक्षाधिन) तथा वनक्षेत्रपाल. बिलगाव (प्रा.) यांच्या गुप्त बातमीवरून बिलगाव (प्रा.) वनक्षेत्रातील बिलगाव परिमंडळातील नियतक्षेत्र बिलगाव कंपा.नंबर ७७ यातील मौजे -बिलगाव (निलदेयपाडा) येथील जंगल भागात बिलगाव व अक्राणी रेंज स्टाफसह फिरती करीत असतांना नाल्यात ठिकठिकाणी अवैधरित्या लाकुड तोडून विक्रीच्या उद्देशाने कु-हाडीच्या साह्याने तोडून तासतूस करून ठेवलेल्या साग लाकडाचा दांड्या ६३ नग मिळून आल्या. आरोपीचा आजूबाजूस शोध घेऊन बघितला असता मिळून आला नाही.
सदर मुद्देमाल वनकर्मचारी यांनी शिर ओझयाने कोरडया नाल्याच्या स्त्यावरुन वाहतूक करुन शासकीय वाहनाने खाजगी वाहनाने धडगाव टिंबर डेपोवर आणून पावतीने जमा केला. सदर मालाचे मोजमाप केले असता साग दांड्या ६३ नग २.५४६ घनमिटर ५२ हजार ८८५ रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला.सदर गुन्हयाबाबत वनरक्षक बिलगाव अव्वल कारकुन एम.एम.वळवी यांनी त्यांच्याकडील वनगुन्हा क्रमांक भारतीय वनअधिनोयम १९२७ चे कलम २६ (१) ड, इ , फ अन्वये नोंदविला. सदर गुन्हेकामी योग्य ती कागदपत्रे तयार केली.
सदर कारवाई श्रीमती निनू सोमराज, वनसंरक्षक सो.धुळे( प्रा.). संतोष सस्ते उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार , राजेंद्र सदगीर विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे, संजय साळुंके सहाय्यक वनसंरक्षक अक्राणी (रो .ह. यो.). यांच्या मार्गदर्शनाखाली व रोशन बुवा सहाय्यक वनसंरक्षक ( परिविक्षाधीन) तथा वनक्षेत्रपाल बिलगांव ( प्रा) यांच्या नेतृत्वाखाली वनपाल भूषा बी.एम.परदेशी, वनपाल भादल राकेश ठाकरे , एम. एम. वळवी, आकाश पावरा, अमरसिंग पावरा , अनिल पाडवी, केसरसिंग पावरा, राकेश पावरा, श्रीमती ज्योती पावरा , सविता पावरा, वाहन चालक हेमंत पावरा , रखवालदार राकेश वळवी यांनी कारवाई केली .पुढील तपास श्रीमती सुषमा पवार वनपाल बिलगाव या करीत आहेत.
Post a Comment
0 Comments