सातपुडा पायथा परिसरात आंब्याअगोदर चिकूचा गोडवा
तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथा परिसरात रोझवा पुनर्वसन,गोपाळपूर,जीवननगर पुनर्वसन,रांझणीसह परिसरात केसर आंब्याअगोदर आता चिकूचा गोडवा चाखायला मिळत असून शेतकऱ्यांकडून चिकूची शेतबांधावर तसेच घराच्या अवतीभवती लागवड केली असून त्यांना यावर्षी चांगली फळे आले असून शेतकऱ्यांकडून ती कच्ची फळे तोडून धान पिकाच्या चाऱ्यात ठेवून पिकवण्यात येत असून हे चिकू स्थानिक परिसरात नातेवाईक, मित्रमंडळी यांना देण्यात येत असून सर्वाकडून चिकू अतिशय गोड असल्याबाबत सांगण्यात येत आहे.
येत्या काळात सातपुडा पायथा परिसरात चिकूचे उत्पादन वाढ होणार असल्याचे चित्र असून मोठ्या प्रमाणावर इकडील चिकू बाजारपेठेत दाखल होईल असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान चिकू लागवडीसाठी उत्तम निचराची खोल आणि मध्यम काळी जमीन योग्य राहत असल्याने ती निवडून शेणखत आणि कंपोस्ट खत मातीत मिसळू मातीची गुणवत्ता वाढवून चिकू लागवड करण्यात येऊन चिकूला नियमित पाणी देण्यात येऊन चिकू चांगला प्रकारे वाढत असल्याचे सांगण्यात येत असून चिकूचे उत्पादन तीन ते चार वर्षात सुरू होत असल्याबाबतही सांगण्यात येत आहे. परिसरात कालीपत्ती आणि क्रिकेट बॉल या सुधारित जातींच्या चिकू लागवड करण्यात आली असून यंदाही एप्रिल मे मध्ये चिकूच्या कलमांची लागवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चिकू खाण्याचे काही फायदे
चिकू फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊन बद्धकोष्ठता कमी होते.
चिकूमध्ये अँटिऑक्सिडंट असतात. जे शरीरामधील हानिकारक घटकांना नष्ट करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
चिकूमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. जे हृदयासाठी आवश्यक आहे.
चिकूमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने पोट भरण्याची भावना निर्माण होते आणि जास्त खाण्यापासून रोखते.त्यामुळे वजन व्यवस्थापनात मदत होते.
चिकूमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस चा चांगला स्रोत आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. चिकूमध्ये विटामिन ए सी आणि ई असते. जे त्वचेसाठी चांगले आहे. चिकू ₹मध्ये पोटॅशियम असते. जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
चिकूमध्ये विटामिन ए असते. जे डोळ्यांसाठी आवश्यक आहे.
चौकट
माझ्या वडिलांनी घराच्या आजूबाजूस चिकूची लागवड केली होती. आता मोठ्या प्रमाणावर फळे येऊ लागली असून ते घरीच धानपिकाच्या चाऱ्यात पिकवण्यात येत असून ही फळे खाण्यास अतिशय रुचकर व गोड असून आबालवृद्धांसाठी पर्वणीच ठरत आहे.
ज्ञानेश्वर पावरा
रोझवा पुनर्वसन
Post a Comment
0 Comments