Type Here to Get Search Results !

तळोद्यात सहयोग सोशल ग्रुप तर्फे जल सेवेच्या शुभारंभ.

 तळोद्यात  सहयोग सोशल ग्रुप तर्फे जल सेवेच्या शुभारंभ.


तळोदा:-

सध्याच्या  रणरणत्या उन्हात शितल जलची अत्यंत आवश्यकता असताना याच्या मात्र सर्वांना विसर पडला आहे मात्र तळोदा शहरात जलसेवेच्या शुभारंभ करण्यात आला आहे . तळोदा येथील सेवाभावी सामाजिक संस्था सहयोग सोशल ग्रुप तर्फे कॉलेज रोडवर सहयोग जलसेवा  सुरू करण्यात आली आहे या सेवेच्या शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर योगेश बडगुजर व संतोष जैन यांच्या हस्ते करण्यात आला, 


याप्रसंगी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन यांनी सहयोग सोशल ग्रुप तर्फे  राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली सध्याचे रणरणत्या उन्हात या रस्त्याने जाणारे येणारे नागरिकांना शितल सहयोग जल मिळाल्याने कडक उन्हात त्यांचे तहान भागणार आहे यासाठी ही जलसेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले या प्रसंगी प्रमुख अतिथी   म्हणून रोहित समदडिया संतोष चोपडा कुशल  जैन किसन भरवाड विनोद माळी रमेश कुमार भाट नितीन पाटील अशोक पाटील कांचन जैन पारस सोनी शशी जैन प्राध्यापक पूजा जैन मीना जैन डॉक्टर प्रांजल समदडिया भावना समुदडीया आदित्य जैन मोईन पिंजारी प्रमोद जांगिड आदी उपस्थित होते सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन यांनी सर्वांचे आभार मानले .

Post a Comment

0 Comments