Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

२०२५ च्या खरीप हंगामाची तयारी सुरू; जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक संपन्न !

 २०२५ च्या खरीप हंगामाची तयारी सुरू; जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक संपन्न !

आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२५ च्या खरीप हंगामपूर्व नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस प्रमोदकुमार पवार (अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नंदुरबार), संदीप पाटील (पोलीस उपअधीक्षक), किशोर हडपे (कृषि विकास अधिकारी, जि.प.), विविध बियाणे व खत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत खरीप २०२५  साठी नंदुरबार जिल्ह्यासाठी १०१६५ ३मे.टन खताचे आवंटन शासनाकडून मंजूर करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. तसेच मागील हंगामातील खते व बियाण्यांच्या वापराचा आढावा घेऊन, आगामी हंगामासाठी नियोजन सादर करण्यात आले.


जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.


शेतकरी बांधवांसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खरीप हंगाम २०२५ ची मजबूत पायाभरणी सुरू!


#खरीप2025 #शेतीविकास #नंदुरबार #कृषिनिविष्ठा #शेतकरीहित #MAIDC #MCDC #KharifPlanning2025

Post a Comment

0 Comments