Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोद्यात संविधान उद्देशिका वाचनाने सामाजिक समता सप्ताह अंतर्गत न्यू हायस्कूलमध्ये संविधान वाचन

 

तळोद्यात संविधान उद्देशिका वाचनाने सामाजिक समता सप्ताह अंतर्गत न्यू हायस्कूलमध्ये संविधान वाचन


सामाजिक न्यास व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य शासनाचा सूचनेनुसार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह दि ८ ते १४ एप्रिल  या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. संविधान उद्देशिकेचे वाचन  करून समता सप्ताह प्रारंभ करण्यात आला. येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब बहु माझ्या शाळेत विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पटवून संविधानाचे वाचन करण्यात आले यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक साहेबराव खैरनार, प्रमोद सोनवणे, संकेत माळी उपस्थित होते.


सामाजिक समता सप्ताह दरवर्षी ८ते१४ एप्रिल या कालावधीत साजरा केला जातो. अनुसुचित जाती अनुसूचित जमाती वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासना कडून केल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला व्हावी या सप्ताह अंतर्गत संविधान उद्देशिकेचे वाचन संविधाना हक्क कर्तव्य व जबाबदारी सह संविधानाचे महत्व शाळेत,महाविद्यालयात, वसतिगृहात ,वस्तीत इत्यादी ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. 

 

दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताह अंतर्गत सविधान जनजागृती डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांच्या विचारावर आधारित वक्तृत्व,निबंध,लघुनाट्य स्पर्धा विविध कल्याणकारी योजनांची माहिती सामाजिक न्यास विभागाचा योजनांची समता दूता  मार्फत प्रबोधन, मार्जिनमनी  कार्यशाळा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती कार्यक्रम संविधान जागर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. अशी माहिती समतादूत कल्पना ठाकरे यांनी दिली.


Post a Comment

0 Comments