Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

इटारसी (मध्यप्रदेश ) येथे श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान...!

 इटारसी (मध्यप्रदेश ) येथे श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान...!

                             नंदुरबार (प्रतिनिधी)- सोशल मिडीयाद्वारे रक्तदात्यांची साखळी निर्माण करुन रक्तदान या महान कार्यात पुढाकर घेणाऱ्या नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा 'मध्यप्रदेश रक्तदान सेवा गृप व ऑल इंडिया ब्लड मोटिवेटर्स, इटारसी तर्फे आंतरराष्ट्रीय रक्तवीर सम्मान- 2025 ने सन्मानित करण्यात आला आहे.श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा हा 2025 चा 3रा पुरस्कार आहे.

नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन या संस्थेने व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातुन अनेक रक्तदात्यांची साखळी तयार केली आहे. जिल्हा रूग्णालयात रक्ताचा तुटवडा भासल्यावर व गरजु रूग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी या फाऊंडेशनच्या माध्यमातुन आवाहन केल्यावर गरजुंना रक्तदान करण्यासाठी रक्तदाते धावुन येतात. यामुळे वेळेवर रक्त उपलब्ध झाल्यावर रूग्णांना जीवदान मिळते. रक्तदान हे महान कार्य असून रक्तदानाची साखळी श्री छत्रपती ब्लड फाऊंडशनने सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जोडुन ठेवली आहे. म्हणुन या कार्याची दखल घेत मध्य प्रदेशातील इटारसी  येथील मध्यप्रदेश रक्तदान सेवा गृप व ऑल इंडिया ब्लड मोटिवेटर्स इटारसी मार्फत श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला 'आंतरराष्ट्रीय' रक्तवीर सम्मान- 2025 जाहीर केला. इटारसी येथे झालेल्या कार्यक्रमात


श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचे सक्रिय सदस्य अरुण साळुंखे व रामकृष्ण पाटील यांनी हा पुरस्कार घेतला. याप्रसंगी माननीय दर्शन सिंह चौधरी खासदार नर्मदापुरम, माननीय डॉ. सीतासरन जी शर्मा पूर्व विधानसभा अध्यक्ष ,माननीय पंकज चौरे अध्यक्ष न. पा. परिषद इटारसी, डॉ. आर. के. चौधरी, अधीक्षक डी. एस. पी.एम. अभिषेक अग्रवाल शिशुरोग विशेषज्ञ, इटारसी,आयोजक व संस्थापक अध्यक्ष आशिष अरोराजी हे उपस्थितीत होते.श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनच्या चळवळीत महेंद्र झवर, जीवन माळी अजय देवरे, हितेश कासार, सुधीरकुमार ब्राम्हणे. पो.कॉ. अभय राजपूत आदींचे योगदान आहे.

Post a Comment

0 Comments