Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा येथे दि.९ रोजी गुरव समाजाचा वार्षिक सभा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा

 तळोदा येथे बुधवारी गुरव समाजाचा वार्षिक सभा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा

 

                             तळोदा येथे समस्त दहिगाव गुरव समाजाची वार्षिक सभा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा दि.९ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

 तळोदा येथिल समस्त गुरव समाज पंच मंडळाच्या वतीने दि.९ रोजी सकाळी ९ वाजता आदिवासी भवनात वार्षिक सभा तसेच विध्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे प्रमुख  अतिथी म्हणून आ.राजेशजी पाडवी तसेच भाजपचे जेष्ठ नेते डॉ.शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष अजयभय्या परदेशी, मनुदेवी बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष योगेश चौधरी,शिवसेना तालुका प्रमुख अनुप उदासी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण गुरव आदि उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमात राज्यस्तरीय तंत्रज्ञान पुरस्कार प्राप्त माध्यमिक शिक्षक रविंद्र गुरव, आदित्य सतिष गुरव (प्रोजेक्ट मॅनेजर,ईडीएफ एनर्जी ब्रिजवाटर युके),ज्योतिष भास्कर गोकुळ गुरव,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे चि. ओम ज्ञानेश्वर गुरव आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे.कार्यक्रमाला दहिगाव गुरव समाजाचे संस्थपक अध्यक्ष सुरेश गुरव, गुरव समाज संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सतिष कुवर,गुरव समाजध्यक्ष सुधाकर गुरव ,अध्यक्ष नाशिक जिल्हा गुरव समाज शिवसेवा प्रतिष्ठान आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर सोहळ्याला जिल्ह्यातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक तथा गुरव समाजाचे उपाध्यक्ष कालिदास गुरव,कोषाध्यक्ष दिलीप गुरव ,सचिव प्रशांत गुरव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments