Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सामाजिक समता सप्ताह विविध कार्यक्रमांनी संपन्न दिनेश सुर्यवंशी

 सामाजिक समता सप्ताह विविध कार्यक्रमांनी संपन्न

दिनेश सुर्यवंशी


                       नंदुरबार, दिनांक 15 एप्रिल, 2025 (जिमाका) :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, होळतर्फे हवेली, येथे विविध कार्यक्रम घेण्यात आल्याचे शाळेचे मुख्याध्यापक दिनेश सुर्यवंशी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


या सप्ताहाचा उद्घाटन 8 एप्रिल 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना उद्देशिकेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. 9 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.  11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याची माहिती शिक्षक भरत माळी यांनी दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविदास वळवी, शंकर महाजन, पूनम पाटील, नलिनी पाटील आणि कविता भामरे यांनी विशेष सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments