नेमसुशील कनिष्ठ महाविद्यालयात सामाजिक सप्ताह साजरा..
तळोदा :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला श्रीमती कल्पना ठाकरे मॅडम समतादूत (बार्टी पुणे) उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी मार्गदर्शन करून सामाजिक सप्ताहाचे महत्त्व पटवून दिले व संविधानाचे महत्त्व सांगून संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले या कार्यक्रमाला नेमसुशील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुनील सुदाम परदेशी सर तसेच मुख्याध्यापिका श्रीमती भावना डोंगरे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सायसिंग वसावे सरांनी केले
संस्था अध्यक्ष श्री निखिल कुमार तुरखिया, उपाध्यक्ष श्री महाले आप्पा,सचिव श्री संजय भाई पटेल, संचालिका सोना बेन तुरखिया तसेच संस्था समन्वयक हर्षिल तुरखिया यांनी कार्यक्रमाचे कौतुकास्पद अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments