Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा तालुक्यातील १० गावांनाआमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून पाण्याच्या टँकरचे वितरण

 तळोदा तालुक्यातील १० गावांनाआमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून पाण्याच्या टँकरचे वितरण

 तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो 

नंदुरबार जिल्हा परिषद पाणीपुरवठा नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत तळोदा तालुक्यातील एकूण दहा गावांना आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून पाण्याचे टँकर वितरित करण्यात आले.


 उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची  टंचाई निर्माण होत असते, नागरिकांना दररोज पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामीण जनतेला तात्काळ दिलासा मिळावा, या उद्देशाने आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष पुढाकारातून व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ही व्यवस्था करण्यात आली आहे.

आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून सोमावल, राजवीहीर, मोदलपाडा, बोरद, आमलाड, मोड, कढेल, कळमसर, मोहिदा, प्रतापपूर व चिनोदा या ग्रामपंचायतींना पाण्याचे टँकर सुपूर्द करण्यात आले. सदर पाण्याचे टँकर आमदार राजेश पाडवी यांच्या निवासस्थानी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींना औपचारिकरित्या प्रदान करण्यात आले.


या उपक्रमामुळे संबंधित गावांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होणार असून, उन्हाळ्याच्या काळात होणारा पाण्याचा गंभीर प्रश्न काही अंशी सुटणार आहे. पाणीटंचाईच्या काळात लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या या तत्काळ निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून ग्रामस्थांनी आमदार राजेश पाडवी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.


यावेळी सर्व संबंधित ग्रामपंचायतींचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी,विजय राणा, वीरसिंग पाडवी, विठ्ठल बागले, प्रवीण पाडवी आदी मान्यवर उपस्थित राहून त्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

आगामी काळातही तळोदा तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी दिले.

Post a Comment

0 Comments