मोड येथे रविवार पासून शिवमहापुराण कथेला प्रारंभ
प.पू.भागवताचार्य सिद्धेश्वरीजी दीदी यांच्या सुश्राव्य वाणीतून कथेचे निरूपण
तळोदा तालुक्यातील मोड येथे शिवमहापुराण कथेला दि. ७ पासून प्रारंभ होत आहे. या कथेचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मोड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
मोड येथिल येथील चैतन्यश्वर महादेव मंदिर चौकात ग्रामस्थांच्या वतीने रविवार दि.७ डिसेंबर ते शनिवार दि. १३ डिसेंबर दरम्यान शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजे दरम्यान या कथेचे निरूपण होत आहे.
या शिव महापुराण कथेचे निरूपण उमर्दे बु. कोठली ता.जि. नंदुरबार येथील भागवताचार्य सिद्धेश्वरीजी दिदी यांच्या सुश्राव्य वाणीतून होत आहे. दरम्यान रविवार दि.७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता गावातून वाजत गाजत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. तर दुपारी २ वाजेपासून कथेला प्रारंभ होत आहे.या शिवमहापुराण कथेचा तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील जास्तीत जास्त शिवभक्तांनी तसेच भाविकांनी लाभघ्यावा, असे आवाहन मोड येथील ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे


Post a Comment
0 Comments