तळोदा तालुक्यातील खर्डी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचे जर्मन भाषा परीक्षेत मोठे यश
तळोदा तालुक्यातील खर्डी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या प्रदीप सुंदरराव जामकर यांनी पुणे येथे telc institute मार्फत घेतलेल्या जर्मन भाषेच्या इंटरमिजिएट लेवल ची B1 ही इंटरनॅशनल परीक्षा पास केली. महाराष्ट्र व जर्मन मधील व्युटेनबर्ग राज्याचा मनुष्यबळ करार झालेला असून SCERT मार्फत राज्यातील इच्छुक शिक्षकांना मागील एक वर्षांपासून केदार जाधव (म्युनिक , जर्मनी) यांनी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले आहे.
राज्यातून 50 शिक्षक दुसऱ्या लेवलची तर फक्त दोनच शिक्षक तिसऱ्या लेवलची परीक्षा पास होऊ शकले, त्यातील जामकर सर एक आहेत. ही परिक्षा पास झाल्यानंतर जर्मन सरकार तेथील कायमस्वरूपी नागरिकत्व देऊ करते म्हणून ती खूप महत्वाची मानली जाते.त्याच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर,शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव, हवा मल्लिनाथ माऊलींच्या प्रेरणेने व केदार जाधव केदार, कैलास लोहार केंद्रप्रुमुख यांनी अभिनंदन केले आहे.जामकर हे साईनाथ वारकरी भजनी मंडळ सदस्य असून मंडळात गायन करत असतात.यांच्या मार्गदर्शनाखाली जय भारत माता सेवा समिती मार्फत जामकर यांनी क्लासेस सुरू करून जिल्यातील बेरोजगारांना ऑनलाईन व ऑफलाईन मोफत प्रशिक्षण देणार आहेत. जर्मनी मध्ये रोजगाराच्या खूप संधी आहेत व पगारही इथल्या पेक्षा दहापट जास्त आहे. कौशल्य कामगार जसे ड्रायव्हर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, नर्स, शॉपकीपर, गोडाऊन कीपर तसेच डॉक्टर, इजिनियर्स अशा कामासाठी भरपूर संधी आहेत.
पुढील वर्षात सातपुड्यातून किमान एक विद्यार्थी व एक विद्यार्थीनी तरी जर्मनी मध्ये नोकरी करन्यासाठी जावे हा त्यांचा मानस आहे. इच्छुकांनी पुढील मेल वर(pradip.saee@gmail.com) संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments