शहादा तालुक्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे श्रमदान — ‘वनराई बंधारा’ उपक्रमातून जलसंधारणाचा आदर्श
शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आज एक अनोखा आदर्श घालत ‘श्रमदानातून जलसंधारण – विकासाच्या दिशेने’ हा संदेश देत नागझिरी ग्रामपंचायतीत वनराई बंधारा उभारण्याचा उपक्रम राबवला. ग्रामीण विकासात जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम शासकीय अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून प्रत्यक्ष कृतीत उतरलेला पाहायला मिळाला.
हा उपक्रम मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. संजय सोनवणे व सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. विकास राठोड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत अधिकारी बांधवांनी सामूहिक श्रमदान करत जलसंधारणाचे उत्कृष्ट काम हाती घेतले.
या श्रमदानात सहभागी अधिकारी:
कुवरसिंग नाईक, नारायण पवार, संतोष पाडवी, किशोर वळवी, रमेश गावीत, मनोज पाडवी, गणेश चोरे, लालसिंग कोकणी, चंद्रसिंग ठाकरे, सुरेश कोकणी, वामन पाडवी, मुकुंद चोरे, अजय वसावे, भरत गोटम, मन्साराम सोनवणे तसेच गावातील रोजगार सेवक.
वनराई बंधाऱ्यामुळे मिळणारे लाभ:
• जलसाठा वाढ
• भूजल पातळी सुधारणा
• शाश्वत शेतीला चालना
• गावाच्या सर्वांगीण विकासाला गती
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेला हा उपक्रम शासनाच्या जलसंधारण अभियानाला बळ देणारा असून ग्रामीण विकासाचा प्रेरणादायी नमुना ठरला आहे.
.
.
.
@zillaparishadnandurbar Zilla Parishad, Nandurbar
#Nandurbar #Shahada #Jalsandharan #WaterConservation #VanraiBandhara #RuralDevelopment #ShahadaTaluka #GramPanchayat




Post a Comment
0 Comments