नेमसुशिल विद्यामंदिरात विद्यार्थी दिवस साजरा
तळोदा :- शहरातील नेमसुशिल विद्यामंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे मुख्या. श्रीमती पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी मुख्या. श्रीमती भावना डोंगरे मुख्या. गणेश बेलेकर सर होते.
डॉ. बाबासाहेब यांचा सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या प्रतापसिंह हायस्कूल पहिल्या इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला होता.अतिउच्च दर्जाची विद्वत्ता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले त्यांच्या कार्याचा उजाळा देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षक सागर मराठे यांनी विद्यार्थी दिनाचे महत्व विशद केले प्रा.आय.पी.बैसाने यांनी बाबासाहेबांचे जीवन चरित्र संबोधित केले प्रसंगी शिक्षक अरुण कुवर यांनी भीम गीत गायन करून अभिवादन केले.
कार्यक्रमाला रविंद्र गुरव रेखा मोरे कमलेश पाटील सचिन पाटील प्रतिभा गुरव अश्विनी भोपे अंकित डोंगरे सचिन पंचभाई मुकुंदा महाजन संदिप वसावे माधुरी पाटील कोमल सोनवणे माधुरी वाघ सविता खोंडे सुनीता वसावे सरिता नाईक वर्षा पावरा सायसिंग वसावे नितीन भामरे शैलेंद्र पाटील रोहित यादव ईश्वर चित्रकथे समाधान मराठे गणेश पाडवी अविनाश पाडवी मोहनभाऊ आदि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment
0 Comments