कोंढावळ उपसरपंच पदी अनिता विनोद अहिरे यांची बिनविरोध निवड
शहादा तालुक्यातील कोंढावळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कट्टर भुजबळ समर्थक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा महात्मा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक विनोद अहिरे यांच्या धर्मपत्नी अनिताबाई अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसरपंच हिराबाई आनंदा माळी यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने, त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच गोपाल भिल यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी सदस्या अनिताबाई विनोद अहिरे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अनिता अहिरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. सूचक भुरीबाई ब्रिजलाल भील म्हणून यांनी स्वाक्षरी केली. सभेचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी..गोविंद गिरासे यांनी काम पाहिले.
यावेळी मावळते उपसरपंच हिराबाई माळी यांनी नवनिर्वाचित उपसरपंच अनिता अहिरे यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या, यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य गोपाल भगवान भील सरपंच, मीराबाई दिलीप ईशी, आशाबाई लक्षुमन भील, हिराबाई आनंदा अहिरे, अर्जुन मका शेवाळे, निंबा उखा माळी, फुलसिंग देवराम भील, भिकूबाई केशव भील, किशोर लक्षुमन भील, राधाबाई आसाराम ठाकरे, भुरीबाई ब्रिजलाल भील. उपस्थित होते. अनिता अहिरे यांचे सरपंच, सदस्य ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
यावेळी माजी सरपंच दिलीप भील,माजी सरपंच लक्षुमन भील, समता परिषदेचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे,तंटा मुक्ती अध्यक्ष दीपक अहिरे, प्रगतीशील शेतकरी प्रकाश अहिरे, युवा शेतकरी विष्णू भील, ब्रिजलाल भील,नारायण अहिरे, नाना मिस्तरी,पंकज अहिरे,समाधान अहिरे, भास्कर अहिरे, अशोक ईश्वर अहिरे, गोपाल अहिरे, प्रेम वैराळे, विकास सैंदाणे, राकेश वाघ,आदी ग्रामस्थ, ग्रामसेवक गोविंद गिरासे, कर्मचारी भानुदास माळी, अशोक अहिरे, रवींद्र माळी उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments