Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

प्रभाग तीन सह परिसर सामाजिक समस्या व प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरू ; तळोद्यात प्रभाग तीन सुनील पवार (मराठे) प्रबळ दावेदार

प्रभाग तीन सह परिसर सामाजिक समस्या व प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरू ; 

तळोद्यात प्रभाग तीन सुनील पवार (मराठे) प्रबळ दावेदार 

   तळोदा / सप्त नगरी न्यूज ब्युरो

 तळोदा :- नगर परिषद निवडणुक इच्छुकांनी तयारी सुरू केली. प्रभाग तीन मधील स्वखर्चाने काटेरी झुडपे व साफसफाई करीत समाज कार्य करीत असून  विविध सामाजिक व धार्मिक कार्य छाप देखील ठळक आहे.

प्रभाग तीन मध्ये सुनील पवार (मराठे)  संभाव्य उमेदवार म्हणून पहात आहेत. नागरिकांकडून प्रतिसाद मिळत  प्रभाग तीन मधून प्रबळ दावेदार मानले जात आहे.

                    तळोदा शहरात गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक व धार्मिक कामे करीत भरीव सामाजिक कार्य  सुनील पवार (मराठे)  केली आहे. प्रभाग तीन मधील समस्या स्वच्छता कामा हाती घेतले आहे.

नगरपालिका प्रभाग ३ चे संभाव्य उमेदवार सामाजिक कार्यकर्ते सुनीलभाऊ मराठे (पवार) स्वतः तळोदा नागरी वस्तीतील ओपन पेस व ओपन प्लॉट वरील झाडे झुडपे व स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. 



स्वतः दोन जेसीबी लावून स्वतः उभे राहून स्वच्छता करून घेत आहेत. त्यासाठी त्यांना खूप लोकांचा पाठिंबा मिळत आहे.


 त्यांनीच नगरपालिका प्रभाग ३ मध्ये उमेदवारी करावी यासाठी जोर वाढत आहे. त्यांच्या कामा मुळे सर्वत्र त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे. 

शहरातील समस्यांची जाणीव असून सर्व समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी  धडपड करीत असतात.  पालिका निवडणुकीत प्रभाग तीन मध्ये संभाव्य उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. 


 नागरिकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा  जोरदार चर्चा आहे. त्यांचा कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी मिळते ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवितात याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments