Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी-अक्कलकुवा-आमलीबारी घाटातील शाळा बस अपघातस्थळाला जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट...

मोलगी-अक्कलकुवा-आमलीबारी घाटातील शाळा बस अपघातस्थळाला जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट...

दिनांक 9 नोव्हेंबर रोजी मोलगी-अक्कलकुवा आमलीबारी घाटात झालेल्या दुर्दैवी शाळा बस अपघातानंतर आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली.


या अपघातात मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची वैयक्तीक भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना धीर दिला आणि शासनामार्फत सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.तसेच सर्व आवश्यक मदत तत्काळ देण्यात येईल, असे आश्वासन दिले.


जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या दुर्घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांच्या प्रवास सुरक्षेसंदर्भात ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.


शाळा बस वाहतुकीसंबंधी नियमांचे काटेकोर पालन व नियमित तांत्रिक तपासणी सुनिश्चित करण्याचेही त्यांनी परीवहन विभागास स्पष्ट निर्देश दिले.


जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येईल.”

.

.

.

#Nandurbar #DrMitaliSethi #CollectorNandurbar #Akkalkuwa #Molgi #DevgoiGhat #SchoolBusAccident #StudentSafety #GoodGovernance #NandurbarAdministration #रस्तेसुरक्षा #जिल्हाधिकारीनंदुरबार #डॉमित्तालीसेठी

Post a Comment

0 Comments