Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बिजरीगव्हाण येथे राळा पीक प्रात्यक्षिक बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न

 बिजरीगव्हाण येथे राळा पीक प्रात्यक्षिक बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न

नंदुरबार : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली बिजरीगव्हाण (ता. अक्कलकुवा) येथे राळा पिकाच्या प्रात्यक्षिक बियाणे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम IIMR हैद्राबाद, महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. 


यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी राळा पिकाच्या लागवडीचे प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखविले शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्याने उत्साह निर्माण झाला होता.

या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  सि. के. ठाकरे, तालुका कृषी अधिकारी  सुरज नामदास, तसेच कृषी विभागातील अधिकारी व स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमात  जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी राळा पिकाच्या लागवडीचे प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखविले की, ओळीने पेहरणी केल्यास कमी बियाणे लागते आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होते.


जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकरे यांनी राळा लागवडीतील खत नियोजन आणि तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी नामदास यांनी सेंद्रिय निविष्ठा किटच्या वापराविषयी माहिती दिली.


यावेळी मंडळ कृषी अधिकारी  सी. बी. सोनवणे, उप कृषी अधिकारी  दिलीप गावित,  विशाल कदम, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक  किरण खलाणे, सहाय्यक कृषी अधिकारी  तुषार पाडवी, जितेंद्र वळवी आणि परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.


या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी पद्धती, बियाणे व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीचे तंत्र प्रत्यक्ष अनुभवता आले. जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे राळा शेतीचा प्रसार आणि शाश्वत शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

.

.

.

#Nandurbar #Agriculture #RalaCrop #SmartFarming #DrMitaliSethi #ATMA #IIMRHyderabad #FarmersFirst #InnovativeAgriculture #NandurbarDistrict

Post a Comment

0 Comments