'चला अभिव्यक्त होऊया' उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न
पीएमश्री जि. प. उच्च प्राथमिक केंद्रशाळा, जुने धडगाव येथे इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत एकूण १०९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतील शिक्षक विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा म्हणजे 'चला अभिव्यक्त होऊया.' हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत दररोज सकाळी परिपाठाच्या वेळी व सायंकाळी ४:१५ नंतर विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात बसवून प्रत्येक वर्गाला क्रमाने मराठी, हिंदी, इंग्रजी कविता/ Rhymes, नाट्यीकरण, सांभाषण संवाद अशा सादरीकरणांची संधी दिली जाते.
उपक्रमाचे फायदे:
⦁ विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्ती क्षमता विकसित होते.
⦁ स्टेज डेरिंग व आत्मविश्वास वाढतो.
⦁ मनोरंजनात्मक पद्धतीने अध्ययन घडते.
⦁ सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्याने सर्वांगीण विकास साध्य होतो.
⦁ कविता व संवादांचा सामूहिक परिचय होतो आणि कवितेची चाल विद्यार्थ्यांच्या लक्षात राहते.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ आनंददायी नाही, तर शैक्षणिक दृष्टीनेही अत्यंत उपयुक्त ठरत आहे. 'चला अभिव्यक्त होऊया' या उपक्रमामुळे धडगावच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सादरीकरण कौशल्य विकसित होत असून, शाळा शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी ठरत आहे.
.
.
.
#चला_अभिव्यक्त_होऊया #विद्यार्थी_विकास #PMShriSchools #नंदुरबारशिक्षण #आत्मविश्वास #कविताप्रेमी #नाट्यीकरण #सर्जनशीलता #studentdevelopmentprogram




Post a Comment
0 Comments