अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान
पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची बिरसा आर्मीची मागणी
तळोदा:नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सात दिवसापासून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याचे मागणी बिरसा आर्मीने तहसीलदार व कृषी अधिकारी तळोदा यांच्यामार्फत मुख्यमंत्री,कृषिमंत्री,जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिले.
या बाबत निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाताची आलेले कापूस, ज्वारी, सोयाबीन, भात,भगर, मिरची, मका व इतर सर्वाच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाने देशाचा पोशिंदा संकटात आहे.
परंतु,जिल्ह्यात काही भाग सोडला तर पंचनामे होतांना दिसत नाही;हे दुर्दैव आहे.पिकांचे नुकसानी पंचनामे करून अहवाल राज्य सरकारकडे जात नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही.यासाठी संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी,जिल्हा सल्लागार ऍड.गणपत ठाकरे,रापापुर शाखाध्यक्ष शिवाजी तडवी,सल्लागार गणेश पाडवी, शिवदास पाडवी,यशवंत ठाकरे, विनोद गावित,वीरसिंग पाडवी, हुपसिंग नाईक,वसंत वळवी,कालूसिंग वळवी,दिनेश वळवी,कैलास वसावे,भरत ठाकरे आदी. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.



Post a Comment
0 Comments