Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची 14 डिसेंबर रोजी त्रैमासिक बैठक बीड जिल्ह्यातील देवडी येथे एस.एम.देशमुख यांच्या ‘माणिक बागेत’ आयोजन

 अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची 14 डिसेंबर रोजी त्रैमासिक बैठक


बीड जिल्ह्यातील देवडी येथे एस.एम.देशमुख यांच्या ‘माणिक बागेत’ आयोजन

        मुंबई - अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची त्रैमासिक बैठक रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी बीड जिल्हयातील  देवडी येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त  एस.एम.देशमुख यांच्या माणिकबागेत  आयोजित करण्यात आली आहे..परिषदेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, विभागीय सचिव, परिषद प्रतिनिधी, जिल्हा अध्यक्ष, अधिस्विकृती समितीवरील सर्व सदस्यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे आणि डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.. दर तीन महिन्यांला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात विस्तारित कार्यकारिणीची बैठक घेण्याचा निर्णय अ. भा. मराठी पत्रकार परिषदेने  घेतला आहे.. यापुर्वी नांदेड, मुंबई, सिंधुदुर्ग येथे परिषदेच्या बैठका घेण्यात आल्या होत्या.. यावेळेस मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात ही बैठक होत आहे.. बीड जिल्हयातील देवडी हे एस.एम.देशमुख यांचे गाव आहे.. त्यांच्या निसर्गरम्य माणिकबागेत ही बैठक होणार आहे.. परिषदेची संपूर्ण टीम बीड जिल्ह्यात प्रथमच येत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पदाधिकारी बैठकीस येत आहेत.. खालील मार्गाने त्यांना देवडी येथे पोहोचता येईल..


विदर्भातून बैठकीस येणाऱ्यांना परभणी, माजलगाव मार्गे देवडीला पोहोचता येईल.. तर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठी बीड येथे निवास व्यवस्था केली जाणार आहे.. बीड ते देवडी हे अंतर 30 किलोमिटर एवढे असून बीड येथून देवडी पर्यत येण्यासाठी वाहन व्यवस्था केलेली आहे.. सोलापूर, सांगलीहून येणारे पदाधिकारी उस्मानाबाद, केज, धारूर वडवणी मार्गे देवडीला पोहचू शकतात.. ग्रामीण भागात प्रथमच परिषदेची बैठक होत आहे.  त्यामुळे आगळ्या-वेगळ्या वातावरणात होणाऱ्या या बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.. बैठकीत परिषदेच्या भविष्यातील वाटचाल, संघटनात्मक बांधणी, मुंबईतील पुरस्कार वितरण, आदर्श तालुका पुरस्कार वितरण आदिबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत.. यावेळी बीड जिल्ह्यातील  पत्रकारितेत मोठे योगदान देणाऱ्या काही ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.. तसेच स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख स्मृती पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.. या बैठकीस एस.एम.देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, कोषाध्यक्ष हाजी मन्सूरभाई शेख, महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष शोभनाताई जयपूरकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजीनगरचे विभागीय सचिव रवी उबाळे, विभागीय संघटन सुभाष चौरे, जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, वडवणी तालुका अध्यक्ष सतीश सोनवणे आणि त्यांची टीम प्रयत्न करीत आहेत...

Post a Comment

0 Comments