अखंड हरिनाम सप्ताहाचा शतकी महोत्सव
रांझणी येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा
तळोदा तालुक्यातील रांझणी येथे ह.भ.प.वेदशास्त्र संपन्न श्री स्वामी कृष्णानंदजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ह.भ.प.भजनी मंडळ व ग्रामस्थ मंडळी रांझणी यांच्या सहकार्याने दि.२७ ऑक्टोबर ते दि.३ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन केले आहे या भागवत कथा हरिनाम सप्ताहच्या कार्यक्रमामुळे श्री विठ्ठल रुखमाई मंदिरात भाविकांची गर्दी राहणार आहे.
या अखंड हरिनाम किर्तन सप्ताह कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती, भूपाळ्या, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ व रोज दिवसा भागवत कथा दुपारी २ ते ५ तसेच रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या भागवत ज्ञानयज्ञ कथेचे प्रवक्ते ह.भ.प.भागवताचार्य कविताताई साबळे शिर्डीकर हे असून या किर्तन सप्ताहात दि.२७ रोजी यजमान तुकाराम निमजी उगले यांच्यातर्फे कै.निमजी उखाजी उगले यांच्या स्मरणार्थ ह.भ.प.नादब्रम्ह भजनी मंडळ शहादा, दि.२८ रोजी यजमान कंचनगीर भीमगीर गोसावी यांच्यातर्फे कै.भटीबाई कंचनगीर गोसावी यांच्या स्मरणार्थ ह.भ.प.चंद्रकांत महाराज अर्थेकर, दि.२९ रोजी यजमान गणेश जगन्नाथ साळंके यांच्यातर्फे कै.जगन्नाथ काशीराम साळुंके यांच्या स्मरणार्थ ह.भ.प.खुशाल महाराज पिंपळगाव चाळीसगाव, दि.३० ऑक्टोबर रोजी यजमान प्रविण भटाजी कदम यांच्यातर्फे कै.शांताबाई भटाजी कदम यांच्या स्मरणार्थ ह.भ.प.देवेंद्र अरुण पांडारकर शनिमांडळकर, दि.३१ रोजी यजमान शांताराम चिंधु पाचोरे यांच्यातर्फे कै.चिंधु विठोबा पाचोरे यांच्या स्मरणार्थ ह.भ.प.सुदर्शनजी महाराज गोंदुर पाठशाळा, तसेच ३१ रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून दि.१ रोजी यजमान धनराज भवर, भूषण पाचोरे, दुर्गेश कदम, निरज भापकर, महेश चाचोरे, संदिप कुंभार, जयेश कदम यांच्यातर्फे स्वखुशीने ह.भ.प.समाधान महाराज भोजेकर, दि.२ रोजी यजमान काशिनाथ भटाजी कदम, रविंद्र भटाजी कदम, योगेश विठोबा कदम यांच्यातर्फे कै.भटाजी दशरथ कदम यांच्या स्मरणार्थ ह.भ.प.कविताताई साबळे यांचे एकादशीचे किर्तन, दि.३ रोजी यजमान अनिल नारायण मढवी यांच्यातर्फे कै.नारायण गोविंदा मढवी यांच्या स्मरणार्थ ह.भ.प.कविताताई साबळे यांचे काल्याचे किर्तन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
तसेच भागवत कथा पूजेचे यजमान प्रल्हाद ओंकार भारती व सौ.सिमाबाई प्रल्हाद भारती यांच्या हस्ते भागवत कथा पूजेचे आयोजन करण्यात आले असून दैनिक आरतीचे यजमान पूजारी दिलीप गणपत जाधव व सौ.वैशाली दिलीप जाधव यांच्या हस्ते व एकादशी महापुजेचे यजमान तळोदा सारथी फाऊंडेशनचे सदस्य समाधान भिवसन लोखंडे तर एक दिवसाची भागवत कथेचे आरती योगेश शांताराम मराठे तळोदा व अशोक कासार नवसारी यांच्याहस्ते होणार आहे. यात भागवत कथा संगीत साथ गायन व पियोनो वादक राधेश्यामजी सुर्यवंशी नाशिक, तबलाकार कार्तिकजी हिंगणे शेलु, ऑक्टोपॅड वादक वैभवजी थोरात संभाजीनगर तर किर्तन साथ संगत गायनाचार्य ह.भ.प.अजय महाराज देऊरकर, मृदुंगाचार्य ह.भ.प.गोकुळ महाराज शिंदखेडा, ह.भ.प.दिपक महाराज कापसे रांझणीकर, गायानाचार्य ह.भ.प.कल्पेश महाराज धारशेरी यांचीही साथ लाभणार आहे. दरम्यान २७ रोजी सकाळी ९ ग्रंथ मिरवणूक व २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प.आत्माराम भजनी मंडळ रांझणी यांच्यातर्फे श्रीहरीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तसेच या कीर्तन सप्ताहासाठी मंडप व स्टेजचे विशेष सहकार्य रांझणी येथील बालाजी मंडप डेकोरेटर्सचे सागर गोसावी तर साऊंड सर्व्हिसेसाठी रांझणीचे शिवशक्ती मंडप डेकोरेटर्सचे राकेश भापकर यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे. तसेच दि.३ नोव्हेंबर रोजी ११ वाजेपासून भंडारा महाप्रसाद आयोजन करण्यात येणार आहे. तरी या अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या ज्ञानामृत श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन किर्तन व श्रीमद् भागवत कथा नियोजन, समस्त ग्रामस्थ मंडळी व नवयुवक मंडळ रांझणी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments