Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सकल धनगर समाजाची बैठक संपन्न राज्यस्तरीय वधु वर भव्य मेळावा यशस्वीतेसाठी आवाहन

 सकल धनगर समाजाची बैठक संपन्न 

राज्यस्तरीय वधु वर भव्य मेळावा यशस्वीतेसाठी आवाहन 

          अमळनेर - सकल धनगर समाजाची बैठक शिव पेट्रोल पंप कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती .यावेळी धनगर समाज सेवा संघ पुणे तर्फे आयोजित राज्यस्तरीय वधु वर भव्य मेळावा यशस्वी करण्यासाठी माहिती देण्यात आली.

      यावेळी धनगर समाज सेवा संघ पुणे या संस्थेच्या माध्यमातून धनगर समाजातील सर्व पोट शाखेतील वधु वर मेळावा  4 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे .तरी मेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर यांनी सविस्तर याविषयी मार्गदर्शन केले व  समाजासाठी एस.टी .आरक्षण व समाजाच्या  प्रगतीसाठी इतर प्रश्नांविषयी मौर्य क्रांती संघाचे  प्रदेश उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत ,धनगर समाज जेष्ठ नेते हरचंद लांडगे  यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच बहुजन समाजाच्या सामाजिक प्रश्नांविषयी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नानासो मनोहर पाटील यांनी मार्गदर्शन केले .यावेळी सकल धनगर समाजाच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

               या बैठकीला एस.सी .तेले , रमेश देव शिरसाठ, करणखेडा  सरपंच गुलाबराव भागवत,  प्रभाकर लांडगे, प्रदीप कंखरे, मुख्याध्यापक आनंदा हडप, ए.बी. धनगर, माजी सरपंच दिलीप ठाकरे,  वासुदेव धनगर, भगवान  बि-हाडे,  सुशील पवार, दिनकर पाटील,पुणे येथील  अभिनव कडू , रमेश सावळकर , सुहास राहींज ,रमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.सी .तेले यांनी तर आभार प्रदर्शन ए .बी धनगर यांनी केले.

Post a Comment

0 Comments