Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नंदुरबारच्या संत दगा महाराज आयटीआयमध्ये पंतप्रधानांनी केले अल्पमुदत प्रशिक्षणाचे आभासी उद्घाटन

 नंदुरबारच्या संत दगा महाराज आयटीआयमध्ये पंतप्रधानांनी केले 

अल्पमुदत प्रशिक्षणाचे आभासी उद्घाटन 

        नंदुरबार (प्रतिनिधी) कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत शहरातील संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अल्पमुदत प्रशिक्षण उपक्रमाचे आभासी उद्घाटन झाले.

      नंदुरबार येथील संत दगा महाराज  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात  बुधवारी शानदार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम सरस्वती पूजन आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी रमेश गिरी, कौशल्य रोजगार विभागाचे प्रभारी सहाय्यक मंगेश वाघ, प्रमुख वक्ते शिवराज कोळी, फकीरा नरवडे उपस्थित होते. 

          मुंबई येथून आभासी पद्धतीने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील अल्प मुदतीचे रोजगार क्षम कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. नंदुरबार येथील आयटीआय प्रांगणातील कार्यक्रमात संत दगा महाराज औद्योगिक संस्थेचे प्राचार्य वाय. एम. पाटील यांनी उपक्रमा विषयी सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक प्रा. गोपाल महाजन यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिशा वाकळे यांनी तर आभार प्रा.सई वक्ते  यांनी मानले.   


कार्यक्रम यशस्वी तेसाठी संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राध्यापक तसेच सर्व शिल्पनिदेशक आणि गटनिदेशक यांनी परिश्रम घेतले.


 

Post a Comment

0 Comments