Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

एच.डी.एफ.सी.बँक अंतर्गत सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम स्वच्छ भारत अभियान शेजवा शाळेत रांगोळी स्पर्धा

 एच.डी.एफ.सी.बँक अंतर्गत सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम स्वच्छ भारत अभियान शेजवा शाळेत रांगोळी स्पर्धा 

        नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत  इंडियन ग्रामीण सर्विसेस नंदुरबार, अंमलबजावणी संस्था आर्थिक सहाय्य परियोजन यांच्या अंतर्गत रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. 

             एच डी एफ सी बँक  सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम स्वच्छ भारत अभियान  अंमलबजावणी संस्था आर्थिक सहाय्य परियोजना अंतर्गत बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत स्वच्छ भारत अभियान विषयावर आधारित  रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते यावेळी सदरील कार्यक्रमाचे आयोजक अंमलबजावणी संस्था आर्थिक सहाय्यक परियोजन च्या सोशल मोबिलायझर ऑफिसर श्रीमती पिंकी जयस्वाल, क्षेत्रीय समन्वयक पूजा शर्मा ,  समन्वयक संदीप वसावे ,महेश वसावे ,विजय सिंग वसावे हे उपस्थित होते .

      यावेळी शाळेच्या इयत्ता 5 वी ते 10 वी च्या 80 विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर आधारित रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. सदरील रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक इयत्ता  10 वीची विद्यार्थिनी जास्मिनी वसावे ,  द्वितीय क्रमांक इयत्ता 9 वी विद्यार्थिनी अनिषा वसावे आणि, तृतीय क्रमांक इयत्ता 7 वी ची विद्यार्थिनी अक्षरा वसावे  तर उत्तेजनार्थ पारितोषिक इयत्ता 5 वी ची विद्यार्थिनी रिया नाईक, इयत्ता 6 वी ची  विद्यार्थिनी संजीवनी पाडवी इयत्ता 9 वीचा  विद्यार्थी वीर वळवी यांना देण्यात आला  विजयी स्पर्धकांना स्कूल बॅग, पाणी बॉटल ,शैक्षणिक साहित्य शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील व संस्थेच्या SMO श्रीमती पिंकी जयस्वाल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली .उर्वरित सर्व सहभागी स्पर्धांना सुद्धा बक्षिसे देण्यात आली 

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडाशिक्षक विजय पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले आभार रामानंद बागले यांनी मानले. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे उपशिक्षक दीपक वळवी, हरुनणखाॅं शिखलीगर, संदीप गायकवाड श्रीमती संगीता गोखले, लिपिक नेहा शर्मा, शिपाई संजय वसावे, दिनेश पवार, समीर वसावे यादींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments