अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान, भरपाई मिळाली शेतकऱ्यांची मागणी
शहादा तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा शेत शिवाराचे पंचनामे करून नुकसान भरपाई अशी मागणी निवेदनात केली आहे. शहादा येथील उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, शहादा तालुक्यात परतीच्या वादळी पावसामुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे हाता तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटामुळे हिरावला गेला आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतशिवाराचे तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी या निवेदनाद्वारे शासन दरबारी करीत आहोत. हे निवेदन देताना शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सत्यानंदभाई पाटील, संचालक जगदीशभाई पाटील, कपिल पाटील, तुषारगिरी गोसावी, महेंद्र पाटील, भरत गोसावी, गणेश पाटील, मोहन पाटील, जगदीश पाटील, चंद्रकांत पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment
0 Comments